लंडन : खेळाडूंना फक्त मैदानातच दुखापत होण्याचा धोका असतो असे नाही, तर काही दहशतवादीही नामांकित खेळाडूंना घातपात करण्यासाठी सक्रीय असतात. ओसामा बिन लादेन, हा जगातला सर्वात मोठा दहशतवादी होता. हयात असताना लादेनच्या निशाण्यावर 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू होता, त्यासाठी त्याने या खेळाडूच्या संघांलाच मारण्याचा प्लॅन बनवला होता, पण...
अॅडम रॉबिन्सन या जगप्रसिद्ध लेखकाने ' टेरर ऑन दी पीच ' या दहशतवादावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये एक खुलासा केला आहे. रॉबिन्सन यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, " इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा लादेनच्या निशाण्यावर होता. त्याला मारण्यासाठी लादेनने 1998 साली झालेल्या विश्वचषकाच्या वेळी संपूर्ण इंग्लंडच्या संघाला धोका पोहोचवण्याचे ठरवले होते. पण काही कारणास्तव लादेन हा प्लॅन यशस्वी ठरला नाही आणि बेकहॅम या विश्वचषकात खेळू शकला. "
जगामध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी लादेनने बेकहॅमसारख्या नावाजलेल्या खेळाडूला आपल्या निशाण्यावर ठेवले होते. बेकहॅमबरोबर लादेनला मायकल ओव्हनचेही आयुष्य संपवायचे होते. त्यासाठी लादेनने संपूर्ण इंग्लंड संघाचा खात्मा करण्याचे ठरवले होते. पण त्यावेळी इंग्लंडने आपल्या फुटबॉल संघाला जबरदस्त सुरक्षा पुरवली होती. त्यामुळे लादेनला आपला प्लॅन यशस्वी करता आला नाही.