चिन्मय काळे : फुटबॉल विश्वचषकातील साखळी सामन्यातील एक फेरी 32 संघांच्या प्रत्येकी एका सामन्याद्वारे मंगळवारी संपली. विश्वचषकाचे दावेदार असलेल्या मातब्बर संघांना बरोबरीत रोखणारे छोटे संघ. जर्मनीला पराभवाचा धक्का देणारा मेक्सिको आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोची तुल्यबळ स्पेन विरुद्धची हॅट्ट्रिक या पहिल्या फेरीत चर्चेत राहिली. हे सर्व एकीकडे असताना यजमान रशियाचा पहिल्या सामन्यातील 5 गोल्सचा झंझावात सुद्धा कानाडोळा करण्यासारखा नाही.
रशियाचा संघ आजवर खूप जोरदार कधीच राहिलेला नाही. रशियन फुटबॉल संघाची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तशी सुमारच राहिली आहे. त्यामुळे सौदी अरेबिया विरुद्ध पहिल्या सामन्यात रशिया जेमतेम विजय किंवा बरोबरीत सुटेल असा अंदाज होता. पण रशियाने 5-0 ने मिळवलेला विजय यजमान या नात्याने त्यांच्यातील अनन्य साधारण असा आत्मविश्वास दाखवत होता. फ्रान्सच्या संघात 1998 च्या स्पर्धेत मायदेशी खेळताना जो आत्मविश्वास होता, तोच रशियात दिसून आला.
दुसरीकडे ब्राझील, जर्मनी, अर्जेन्टिना, उरुगवे या मातब्बर संघांना त्यांच्या तुलनेने कमकुवत प्रतिस्पर्धिनी चांगलेच पाणी पाजले. उरुगवे ने इजिप्त ला 1-0 ने नमवले खरे पण, 87 व्या मिनीतापर्यंत झुंज देऊनच त्यांना हा विजय मिळाला. गटविजेता जर्मनी पराभूत झाल्याने गटात सध्या सर्वात शेवटी आहे. गत उपविजेता अर्जेन्टिना व ब्राझीलचा सामना बरोबरीत सुटल्याने ते तिसऱ्या स्थानी आहे. जर्मनीला आता दोन्ही सामन्यात विजय अत्यावश्यक असेल. तर ब्राझील, अर्जेन्टिना हे संघ ही पुढील सामना बरोबरीत सुटल्यास संकटात येतील.
विश्वचषकाच्या दवेदारांमध्ये इंग्लड ची कामगिरी चांगली राहिली. इंग्लडने पहिल्या सामन्यात 2-1 ने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लडला खावा लागलेला एक गोलसुद्धा पंचांच्या वादग्रस्त पेनॉलटीमुळे होता. त्यामुळे विश्वचशकाचे दावेदार या नात्याने अन्य बलाढ्य संघात सर्वात चांगली कामगिरी इंग्लडनेच केली.
एकूणच आता साखळी फेरीतील निर्णायक सामने रशिया-इजिप्त यांच्या लढतीपासून सुरू होत आहेत. हे सामने विश्वचषक डावेदारांसाठी मात्र 'आर या पार' असतील.