दिपू (आसाम) : जगभरातील सर्वांत जास्त लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. त्यात विश्वचषकाचा कुंभमेळा म्हटले की करोडो चाहते लाखो रुपये खर्चून यजमान देशात जावून आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात. भारतीय फुटबॉलप्रेमीही यात मागे नाहीत. आसाममधील एक फुटबॉल प्रेमी पुतुल बोरह यांनी रशियात सुरू असलेला फुटबॉल सामन्याचा मैदानावरील थरार अनुभवता यावा यासाठी चक्क १५ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज काढून १८०० स्केअर फुटांचे सभागृह उभारले आहे. यामध्ये ५०० फुटबॉलप्रेमी एकावेळी बसून या सामन्याचा आनंद लुटुत आहेत.
भारतीय संघ विश्वचषक फुटबॉल सामन्यासाठी कधीही पात्र ठरलेला नाही, तरीही फुटबॉलप्रेमींचा उत्साह तसूभर कमी नाही. प्रत्येक विश्वचषक सामन्यांवेळी चाहत्यांकडून काही ना काही वेगळे केल्याचे दिसून येते. यात काहीजण आपल्या घराला आपल्या अवडत्या संघांच्या जर्सीचा कलर देतात. तर काहीजण जागतिक सामन्यांवेळी आपल्या दुकानांतील वस्तूवर सूट देऊन आपले खेळावरील प्रेम दाखवतात.
पुतुल बोरह हे आसाममधील दिपू शहरातील असेच ,क व्यावसायिक. ज्यांना रशियात जाणे शक्य नाही पण तेथील मैदानावरील थरार फुटबॉलप्रेमींना थेट अनुभवता यावा यासाठी त्यांनी चक्क सभागृह उभारायचे ठरवले.त्यासाठी त्यांनी बँकेकडून १५ लाखांचे कर्ज काढले. आणि ५०० लोक बस ूशकतील असे प्रतिकात्मक मैदानासारखे सभागृह उभारले . त्यात ५६ इंच एलसीडी मॉनिटर बसविला आहे. या सभागृहाला ‘जर्मन स्टेडियम’ असे नाव दिले असून, त्यात ३२ संघांचे ध्वज लावले आहेत. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा रशिया आणि सौदी अरेबियादरम्यान झालेल्या उद्घाटन सामन्यावेळी करण्यात आला.