नवी दिल्ली : भारताचा २० वर्षांखालील फुटबॉल संघ २९ जुलैपासून स्पेनमध्ये होणाऱ्या कोटिफ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या २० वर्षांखालील संघाविरुद्ध खेळेल. अर्जेंटिना संघाव्यतिरिक्त भारतीय संघ कोटिफ कपमध्ये व्हेनेजुएला व मौरिटानियाच्या राष्ट्रीय २० वर्षांखालील संघांसोबत खेळणार आहे.त्यांची लढत स्पर्धेत स्थानिक संघ मुर्सिया २० वर्षांखालील संघासोबत होईल. राष्ट्रीय संघाचे संचालक अभिषेक यादव म्हणाले की,भारतीय फुटबॉल महासंघाने एक कार्यक्रम तायर केला आहे. त्यात सर्व राष्ट्रीय संघ स्थानिक स्पर्धांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांही खेळणार आहेत. स्पेनमध्ये होणारी कोटिफ स्पर्धा आमच्या योजनेत बसत असून त्यात खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. २० वर्षांखालील गटात भारतीय संघ फुटबॉलच्या दिग्गज संघांविरुद्ध खेळणार आहे. हे संघ फिफा २० वर्षांखालील विश्वकप २०१९ पात्रतेसाठी तयारी करीत आहेत.’यादव पुढे म्हणाले,‘सर्व वयोगटातील राष्ट्रीय संघाच्या विकासासाठी आम्ही कार्यक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक संघाला नियमित कालावधीत सामने खेळण्याची संधी मिळेल.’फिफा १७ वर्षांखालील विश्वकप स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाºया सर्व खेळाडूंचा २० वर्षांखालील संघात समावेश आहे. (वृत्तसंस्था)>भारतीय संघाचा कार्यक्रम२९ जुलै - भारत विरुद्ध मुर्सिया, ३१ जुलै - भारत विरुद्ध मौरिटाना, ३ आॅगस्ट - भारत विरुद्ध व्हेनेजुएला, ५ आॅगस्ट - भारत विरुद्ध अर्जेंटिना.
भारतीय फुटबॉल संघ अर्जेंटिनासोबत खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:36 AM