लेवांडोवस्की फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:36 AM2020-12-19T02:36:32+5:302020-12-19T02:36:38+5:30

मेस्सी व रोनाल्डो पिछाडीवर

Lewandowski beats Messi and Ronaldo to Best FIFA Mens Player award | लेवांडोवस्की फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

लेवांडोवस्की फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

Next

जिनेव्हा : लियोनेल मेस्सी व ख्रिस्टियाने रोनाल्डो यांचे वर्चस्व मोडीत काढताना पोलंडचा रॉबर्ट लेवांडोवस्की यंदाचा फिफा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरला.

अंतिम यादीमध्ये लेवांडोवस्कीसह मेस्सी व रोनाल्डो यांची नावे होती. राष्ट्रीय संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, निवडक पत्रकार व चाहत्यांच्या मतदानांच्या आधारावर विजेत्याची निवड झाली.फिफाने व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन ज्युरिखमध्ये केले, पण फिफाचे अध्यक्ष जियान्नी इनफांटिनो त्याला वैयक्तिक रूपाने पुरस्कार प्रदान करण्यासाठी म्युनिचला गेले.त्याआधी २०१८ मध्ये क्रोएशियाच्या लुका मोडरिचने हा पुरस्कार पटकावला होता आणि २००८ नंतर मेस्सी व रोनाल्डो यांच्या व्यतिरिक्त या दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे.

लूसी ब्रोंजची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड झाली. फिफा पुरस्कारांमध्ये इंग्लंडचा हा पहिला वैयक्तिक पुरस्कार आहे. लियोनसह चॅम्पियन्स लीगसोबत जुळलेली लुसी आता मॅन्चेस्टर सिटतर्फे खेळते. २००८ नंतर हा पुरस्कार पटकावणारा लेवांडोवस्की स्पेनच्या कुठल्या क्लबचा पहिला खेळाडू ठरला आहे. २००८ मध्ये रोनाल्डोने मॅन्चेस्टर युनायटेडचा खेळाडू म्हणून हा पुरस्कार पटकावला होता.

१९९१ मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली तेव्हापासून बायर्न म्युनिखच्या एकाही खेळाडूला हा पुरस्कार पटकावता आला नाही. फ्रेंक रिबेरी २०१३ मध्ये आणि मॅन्युअल नूयेर २०१४ मध्ये तिसऱ्या स्थानी राहिले होते.

जर्गेन क्लोप यांनी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने ३० वर्षांत प्रथमच प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली.  नेदरलँडला २०१९ मध्ये विश्वविजेतेपद पटकावून देणाऱ्या सरीना विएगमॅनला सर्वश्रेष्ठ महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळाला. 

Web Title: Lewandowski beats Messi and Ronaldo to Best FIFA Mens Player award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.