Copa America : चर्चा तर होणारच, लिओनेल मेस्सीनं फ्री किकवर केला भारी गोल, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 01:20 PM2021-06-15T13:20:58+5:302021-06-15T13:21:24+5:30
Copa America, यूरो 2021चा जल्लोष सुरू असताना सोमवारपासून Copa America स्पर्धेलाही सुरुवात झाली. अर्जेंटीना व चिली या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला आणि अपेक्षेनुसार सामना चुरशीचा झाला.
यूरो 2021चा जल्लोष सुरू असताना सोमवारपासून Copa America स्पर्धेलाही सुरुवात झाली. अर्जेंटीना व चिली या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला आणि अपेक्षेनुसार सामना चुरशीचा झाला. या सामन्याचा निकाल 1-1 असा बरोबरीत लागला असला तरी अर्जेंटिनासाठीलिओनेल मेस्सीनं ( Lionel Messi) केलेल्या गोलची चर्चा रंगली आहे. सामन्याच्या 33व्या मिनिटाला मेस्सीनं फ्री किकवर अफलातून गोल करून संघाचे खाते उघडले, परंतु दुसऱ्या पर्वात चिलीकडून इडूआर्डो व्हार्गासनं ( 57 मि.) गोल करून सामना बरोबरीत आणला.
पाहा मेस्सीचा अफलातून गोल
Morning Blessed With this #Messi What a goal #CopaAmerica2021pic.twitter.com/Am5S3LEtqC
— 💙விக்கி❤️ (@The__Vicky) June 15, 2021
Messi goal against Chile 🔥 🤘#CopaAmerica#Messipic.twitter.com/7v4zZVSXLk
— 𝔏𝔦𝔬𝔫𝔢𝔩 𝔐𝔢𝔰𝔰𝔦 🐐 (@N0ContexMessi) June 14, 2021
He’s been doing it for as long as we can remember yet never fails to drop our jaws in awe of the genius that he is.#CopaAmerica2021#ArgentinavsChile#Messi
— Michel ''Mickey'' Jreissati (@MickeyJreissati) June 14, 2021
pic.twitter.com/CRajwYYohz
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने २०२२ फुटबॉल विश्वचषक आणि २०२३ एशियन कप क्वालिफायरच्या ग्रुप ई मध्ये दुसऱ्या फेरीत बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत बांगलादेशवर २-० अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासोबतच छेत्रीने अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.
या लढतीतील दोन गोलसोबतच सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत सुनील छेत्री ११व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या पुढे दहाव्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटे आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह प्रत्येकी ७५ गोलसह संयुक्तरीत्या दहाव्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या मागे असलेल्या युएईच्या अलीने गेलया आठवड्यात मलेशियाविरुद्धच्या लढतीत आपला ७३ वा गोल केला होता. तर मेसीचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ७२ गोल आहेत.