नवी दिल्ली : फुटबॉलपटू आणि सेक्स, ही चर्चा प्रत्येक विश्वचषकाच्यावेळी रंगताना दिसते. फुटबॉलपटूंना सेक्स लाभदायक असल्याचेही म्हटले जाते. कारण गेल्या विश्वचषकात ज्या संघांना सेक्स करण्याची मुभा दिली होती, ते देश उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले होते. हाच काहीसा इतिहास पाहून मेक्सिकोच्या खेळाडूंनी विश्वचषकापूर्वीच एक पार्टी केली. या पार्टीमध्ये मेक्सिकोचे 9 खेळाडू आणि 30 ललनांचा समावेश होता. या पार्टीत कोणाची शिट्टी वाजली आणि कुणी दंगा केला, याचे वृत्त मेक्सिकोतील टीवी नोटास गॉसिप या स्थानिक वर्तमानपत्रात छापून आले आहे.
मेक्सिकोच्या फुटबॉल संघाने विश्वचषकासाठी जोरदार सराव केला. पण रशियाला जाण्यापूर्वी थोडी मजा करण्यासाठी त्यांनी 30 ललनांबरोबर रंगेल पार्टी केली. हे वृत्त प्रकाशित झाल्यावर त्याची चर्चाही चांगलीच रंगली. पण या खेळाडूंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांच्या फुटबॉल संघटनेने स्पष्ट केले आहे.
मेक्सिकोच्या खेळाडूंनी 2010 साली काही महिलांबरोबर अशीच रंगतदार पार्टी केली होती. त्यावेळी खेळाडूंवर दंड ठोठावण्यात आला होता आणि निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. ब्राझील येथे 2014 साली झालेल्या विश्वचषकात मेक्सिकोच्या खेळाडूंना सेक्स करण्याची परवानगी त्यांच्या फुटबॉल संघटनेने नाकारली होती. त्यामुळे 2014च्या विश्वचषकात मेक्सिकोला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, असे म्हटले गेले होते. त्यामुळे यावेळी मेक्सिकोच्या खेळाडूंवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे संघटनेने सांगितले आहे.