कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा ४ कोटी २५ लाख ४८,०३० इतका झाला आहे. त्यापैकी ३ कोटी १४ लाख ५४,३४३ रुग्ण बरे झाले असून ११ लाख ५०,१४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम अजूनही कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या होत्या, परंतु आता हळुहळू स्पर्धांना सुरुवात झाली आहे. पण, नियमांबाबत कोणतिही तडजोड केली जात नाही. बायो बबल, स्टेडियममध्ये प्रेक्षकांना नो एन्ट्री आदी सर्व नियम कायम आहेत. त्यामुळे खेळाडूंनाही नियमांचे काटेकोर पालन करावे लागत आहे. अशात रेयाल माद्रिद फुटबॉल क्लबच्या स्ट्रायकर ल्युका जोव्हीच याने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि सर्बियन त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मार्च महिन्यात जोव्हीच स्पेनवरून सर्बियात परतला आणि तो बेलग्रेड येथील रस्त्यांवर फिरताना दिसला आणि १४ दिवसांच्या आयसोलेशनमध्ये न राहता त्यानं गर्लफ्रेंड सोबत बर्थ डे पार्टि केली. त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली गेली आणि त्याला ३५ हजार डॉलर रुपयांचा दंड भरण्यास नकार दिल्यानंतर त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जोव्हीचचं नाव न घेता सर्बियन अधिकाऱ्यानं फुटबॉलपटूला देशात कोरोन व्हायरस पसरण्यास जबाबदार धरले आहे.