सेनेगलने आफ्रिकी संघांना दाखवला आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 04:02 AM2018-06-21T04:02:12+5:302018-06-21T04:02:12+5:30

सेनेलगच्या संघाने पोलंडवर विजय मिळवत आफ्रिकन संघांना आशेचा किरण दाखवला आहे.

 Senegal to show African team ray of hope | सेनेगलने आफ्रिकी संघांना दाखवला आशेचा किरण

सेनेगलने आफ्रिकी संघांना दाखवला आशेचा किरण

Next

सोची : सेनेलगच्या संघाने पोलंडवर विजय मिळवत आफ्रिकन संघांना आशेचा किरण दाखवला आहे. सेनेगल व्यतिरिक्त इतर आफ्रिकन देशांना या पाच अन्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. चार वर्षे आधी नायजेरिया, आणि अल्जेरिया हे बाद फेरीत पोहचले होते. तर घानाने २०१० मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र आता असे वाटत आहे की, २०१८ ची ही स्पर्धा आफ्रिकन देशांसाठी एक पाऊल मागे नेणारी ठरेल.
१९९० मध्ये पहिल्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या इजिप्तसाठी ही स्पर्धा पहिल्या सहा दिवसातच संपली. हेक्टर कुपरच्या संघाला मोहम्मद सालाह याच्या फिटनेसच्या समस्याने खूप नुकसान सहन करावे लागले. सुरुवातीच्या सामन्यात त्यांना उरुग्वेकडून पराभव पत्करावा लागला. तर मंगळवारी सालाहच्या उपस्थितीतही रशियाने इजिप्तला १-३ असे पराभूत केले. इजिप्तने सहा प्रयत्नात एकही विश्वचषक सामना जिंकलेला नाही.
>मोरक्कोने पात्रता फेरीत एकही गोल गमावला नाही. मात्र अजिज बुहादौजच्या स्वयंगोलमध्ये त्यांना इराणकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला.
सेनेगलचे प्रशिक्षक एलियोऊ सिसे यांनी पोलंडवर मिळवलेल्या विजयानंतर सांगितले की, ‘आम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करतो पण मला विश्वास आहे, आम्हाला संपूर्ण आफ्रिकेचा पाठिंबा आहे.’

Web Title:  Senegal to show African team ray of hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.