दिएगो मॅराडोनापाठोपाठ आणखी एका 'वर्ल्ड कप हिरो'चे निधन; ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By स्वदेश घाणेकर | Published: November 30, 2020 09:18 AM2020-11-30T09:18:14+5:302020-11-30T09:18:32+5:30
डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला.
दिएगो मॅराडोना यांच्या निधनानं फुटबॉल वर्तुळात शोकाकुळ वातावरण असताना आणखी एका स्टार खेळाडूनं जगाचा निरोप घेतला. सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफइल्डर पापा बौबा डिओप याचं ४२व्या वर्षी निधन झालं. २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत डिओपच्या गोलनं वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता.
डिओपनं २००१ ते २००८ या कालावधीत ६५ सामने खेळले. सेनेगलला २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यूपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आतापर्यंत तीन आफ्रिकन देशांनी वर्ल्ड कपच्या अंतिम ८ संघांमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी एक सेनेगल आहे.
डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना टर्कीकडून पराभव पत्करावा लागला. डिओपनं चार वेळा आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व केलं आणि २००२मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
We are devastated to hear news reports this evening that Papa Bouba Diop has passed away, aged 42.
— Fulham Football Club (@FulhamFC) November 29, 2020
Rest well, Wardrobe 🖤 pic.twitter.com/rvU53Vqkmn
२००४मध्ये त्यानं इंग्लिश क्लब फुल्हॅमचे प्रतिनिधित्व केलं आणि २००८च्या एफए चषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.