सर्गियो ॲग्युरोची विक्रमी कामगिरी, मॅंचेस्टर सिटीला जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:49 AM2018-08-06T08:49:27+5:302018-08-06T08:50:02+5:30

अर्जेंटिनाच्या सर्गियो ॲग्युरोने इंग्लिश प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी क्लबकडून विक्रमी कामगिरी केली.

Sergio Aguero's record, Manchester City's title win | सर्गियो ॲग्युरोची विक्रमी कामगिरी, मॅंचेस्टर सिटीला जेतेपद

सर्गियो ॲग्युरोची विक्रमी कामगिरी, मॅंचेस्टर सिटीला जेतेपद

googlenewsNext

लंडन- अर्जेंटिनाच्या सर्गियो ॲग्युरोने इंग्लिश प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी क्लबकडून विक्रमी कामगिरी केली. चेल्सी क्लबविरुद्धच्या कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धेच्या लढतीत ॲग्युरोने गोल करताच तो सिटीकडून २०० गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने सिटीला जेतेपद पटकावून दिले. 



३० वर्षीय ॲग्युरोने २०११ साली ॲटलेटिको माद्रिदला सोडचिठ्ठी देवून सिटीत दाखल होण्याचा निर्णय घेतला. सिटीकडून सर्व प्रकारच्या फुटबॉल स्पर्धेत आठपैकी तीन हंगामात ३०हून अधिक गोल केले आहेत. चेल्सीविरूध्द त्याने दोन गोल करून सिटीला २-० असा विजय मिळवून दिला. ॲग्युरोच्या नावावर २९९ सामन्यांत २०१ गोल आहेत.

 
त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये सिटीकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर केला होता. नॅपोली क्लबविरुद्ध गोल करून त्याने ७९ वर्षांपूर्वीचा १७७ गोल्सचा विक्रम मोडला होता. हा विक्रम एरिक ब्रूक यांच्या नावे होता. ब्रूक यांनी १९२८-३९ या कालावधीत ४९४ सामन्यांत १७७ गोल केले होते. 

ॲग्युरोने २०११ मध्ये पदार्पणातच स्वानसी सिटीविरूध्द दोन गोल केले होते. युरोप बाहेरील खेळाडूंमध्ये इपीएलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही ॲग्युरोच्या नावावर आहे. त्याशिवाय त्याच्या नावे तीन इपीएल आणि तीन लीग कप जेतेपदे आहेत. मे २०१२ मध्ये क्वीन्स पार्क रेंजर्स विरूध्द ९४ व्या मिनिटाला त्याने केलेला गोल अविस्मरणीय आहे. त्याच्या या गोलने सिटीला ४४ वर्षानंतर प्रीमिअर लीग जेतेपद पटकावून दिले. अॅग्युरोच्या या विक्रमी कामगिरीला क्लबकडून अनोखी भेट देण्यात आली.. पाहा हा व्हिडीओ...

 

Web Title: Sergio Aguero's record, Manchester City's title win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.