याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:11 AM2021-09-26T00:11:55+5:302021-09-26T00:12:15+5:30
फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच...
फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच... तो अभेद्य भिंतीसारखा प्रतिस्पर्धींसमोर उभा असतो म्हणून अन्य सहकारी निर्धास्तपणे खेळू शकतात. पण, ही भिंत आपल्या शरीरावर किती मार झेलते, याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रॉब ग्रीन या गोलरक्षकाच्या हाताचा हा फोटो आहे. प्रतिस्पर्धीनं वेगानं टोलावलेला फुटबॉल रोखून रोखून मागील २० वर्षांत ग्रीनच्या हाताची अवस्था पाहून सारेच अवाक् झाले. ( Rob Green's finger after 21 years as a professional goalkeeper...)
एका फुटबॉलसामन्यापूर्वी झालेल्या त्याच्याशी जिमी फ्लॉयल हॅसेलबेंक चर्चा करत होता आणि त्यावेळी ग्रीननं त्याचं तुटलेलं बोट दाखवलं. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू ज्यानं इंग्लिश प्रीमिअर लीगचे २६७ सामने खेळले आणि गेली दोन दशतं त्यानं वेस्ट हॅम, लिड्स, QPR व चेल्सी अशा क्लबचे प्रतिनिधित्व केले. मागच्या वर्षी त्याचं हे बोट तुटलं. ४१ वर्षीय ग्रीननं त्याचा हात चेल्सिचा माजी फॉरवर्ड हॅसेलबेंक आणि माजी सहकारी बॉबी झामोरा यांना दाखवला. तो हात पाहून हॅसेलबेंक लगेच म्हणाले, हे माझ्यामुळे झाले नाही. तेव्हा बॉबी म्हणाला, तू माझ्याकडे बोट दाखवतोस? तसं करणं थांबव.
Goalkeepers don't get enough respect! 😳 😳 😳 pic.twitter.com/Uuwaqet8Wc
— Best of Football (@BestofFootball8) September 24, 2021