केरळ येथे एका फुटबॉल सामन्यादरम्यान भयानक घटना घडली. मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर येथे एका फुटबॉल सामन्यासाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. ती अचानक कोसळली आणि जवळपास २०० लोकं जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे आहे. ही घटना घडली तेव्हा या प्रेक्षक गॅलरीवर २००० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पाहा व्हिडीओ...