वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

By admin | Published: October 10, 2016 12:55 AM2016-10-10T00:55:43+5:302016-10-10T00:55:43+5:30

गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत.

10 crore tired of electricity consumers | वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

Next

सहा महिने मुदत : अभय योजनेंतर्गत ग्राहकांना मिळणार वीज बिलात सूट
गडचिरोली : गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत. या ग्राहकांकडून वीज बिलाचे पैसे काढण्यासाठी आता वीज विभागाने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बिल थकीत ठेवलेल्या ग्राहकांना काही सूट दिली जाणार आहे. सदर अभय योजना १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातही प्रत्येक महिन्याला वीज बिल पाठविले जाते. सदर वीज बिल प्रत्येक महिन्याला भरणे अपेक्षित असले तरी काही वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नाही. एक महिना वीज बिल न भरल्यास वीज कंपनी कोणतीही कारवाई करीत नसली तरी दोन महिन्याचे वीज बिल न भरल्यास संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवून वीज बिल भरण्यात यावे, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला जातो. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेले ग्राहक वीज बिल भरत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेले गडचिरोली मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागातील १४ हजार ६८८ ग्राहकांकडे ४ कोटी रूपयांची रक्कम थकीत आहे. ब्रह्मपुरी विभागातील ८ हजार ५२४ ग्राहकांकडे १ कोटी ८६ लाख व गडचिरोली विभागातील १५ हजार ८४१ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रूपये थकले आहेत, असे एकूण गडचिरोली वीज मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहकांकडे १० कोटी २० लाख रूपये थकले आहेत.
चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत गडचिरोली मंडळ येते. चंद्रपूर परिमंडळातील ७४ हजार ५१५ ग्राहकांकडे २४ कोटी ५ लाख रूपये थकले आहेत. १ हजार ७४९ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख, १४ कुकुटपालन व्यावसायिकांकडे २ लाख ३२ हजार, ९२० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ४५ लाख ९ हजार, ६३ हजार ८३० ग्राहकांकडे १७ कोटी ४३ लाख, ७१ ग्रामपंचायतींकडे ७ लाख ७१ हजार रूपये थकले आहेत. अभय योजनेंतर्गत या सर्व ग्राहकांना २ कोटी ६३ लाख रूपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज विभागाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

अभय योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरण कंपनीने २०१६-१७ या वर्षासाठी अभय योजना सुरू केली आहे. सदर योजना १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदरांना ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम माफ होणार आहे. पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. पुढील तीन महिने ते सहा महिन्यापर्यंत मूळ थकबाकी भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. अभय योजनेच्या पहिल्याच महिन्यात ज्या थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीतील ५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. थकबाकीतून मुक्त झालेल्यांना त्वरित नवीन वीज जोडणी दिली जाणार आहे. सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चॉर्जेस, रिकनेक्शन चॉर्जमधून सूट दिली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी ग्राहकाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना किती रक्कम भरायची आहे, याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. न्याय प्रविष्ठ असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातीलही ग्राहकांना अभय योजनेत सहभागी केले जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन परवानगी प्रक्रिया व त्याचा खर्च थकबाकीदारांना करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: 10 crore tired of electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.