१० यंत्र करणार भामरागडात रोवणी

By admin | Published: July 27, 2014 11:45 PM2014-07-27T23:45:11+5:302014-07-27T23:45:11+5:30

भामरागड तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी गटांना १० रोवणी यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भामरागड तालुक्यातील

10 Machines to be used in Bhamragarad | १० यंत्र करणार भामरागडात रोवणी

१० यंत्र करणार भामरागडात रोवणी

Next

दुर्गम गावात वितरण : आदिवासी शेतकऱ्यांना दिली यांत्रिकी शेतीची माहिती
भामरागड : भामरागड तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी गटांना १० रोवणी यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीकडे वळविण्याचे प्रयत्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांच्या गटाला धान रोवणी यंत्र पुरविण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्याअंतर्गत जुवी येथील शेतकरी मंडळास प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांच्या हस्ते यंत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, आदिवासी विकास निरीक्षक टांगसेलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी चुक्कू चिन्ना पुंगाटी यांच्या शेतामध्ये यंत्राद्वारे भात रोवणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जुवी येथील १० शेतकरी गटांना कृषी विभागाच्या सहाय्याने बियाणे व रोप तयार करण्यास प्लॅस्टिकचा पुरवठा करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनकवडे म्हणाले, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. या उलट यंत्राच्या साहाय्याने धान रोवणी केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वेळेची बचत होईल. तसेच यांत्रिकी पद्धतीच्या शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळून शेतकऱ्यांची प्रगती होईल, असेही सोनकवडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यांत्रिकी पद्धतीने शेती करण्यासाठी रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावी, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोत्तावार, तलमले, कापगते, मंगरू कुडयामी, लालसु नगोटी, रायधर बाकडा यांनी सहकार्य केले. यावेळी जुवी परिसरातील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 10 Machines to be used in Bhamragarad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.