आरोपीला १० वर्षांचा कारावास
By admin | Published: October 30, 2014 10:51 PM2014-10-30T22:51:22+5:302014-10-30T22:51:22+5:30
चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने आज गुरूवारी भादंविचे कलम ३७६ अन्वये १० वर्षाचा कारावास
बलात्कार प्रकरण : आॅक्टोबर २०११ मध्ये घडली होती घटना
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने आज गुरूवारी भादंविचे कलम ३७६ अन्वये १० वर्षाचा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
रमेश राघोजी कुलसंगे (३०) रा. वालसरा, ता. चामोर्शी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार १२ आॅक्टोबर २०११ रोजी आरोपी रमेश राघोजी कुलसंगे हा इसम सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगाव येथील पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी सायकलने आला. या इसमाशी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी ओळखी नव्हती. मात्र त्याने मी तुमचा नातेवाईक असल्याचे खोटे सांगून अनंतपूरच्या आश्रमशाळेतून पैसे उचलायचे आहेत. अशी बतावणी करून पीडित मुलीला सायकलवर घेऊन गेला. रेखेगावला सायकलने पोहोचल्यानंतर सदर इसम भाडभिडी या गावात उतरून एका बाईच्या घरी पाणी पिला. त्यानंतर पेटतळा मार्गे सायकलवर बसून नहराच्या रस्त्याने जंगलात घेऊन गेला, असे पीडित मुलीने चामोर्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने माझा हात धरून पायी जंगलात घेऊन गेला. त्यानंतर कपडे काढायला सांगितल्यावर आपण त्याच्या जीवे मारण्याच्या धमकीने कपडे काढले. त्यानंतर माझी ओढणी जमिनीवर पसरवून आपल्याशी बळजबरीने संभोग केला. अशाच प्रकारचे कृत्य त्याने पुन्हा दोनदा जंगलात केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी नराधम रमेश याने दिली, असेही पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)