बियाण्यांचे १३ नमुने आढळले अप्रमाणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:05 PM2019-05-09T22:05:45+5:302019-05-09T22:06:32+5:30
सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाण्यांचे एकूण ५११ नमुने तपासण्यात आले. यापैकी १३ नमूने अप्रमाणित आढळून आले. यातील ५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणात पात्र असून ८ प्रकरणे ताकीदपात्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाण्यांचे एकूण ५११ नमुने तपासण्यात आले. यापैकी १३ नमूने अप्रमाणित आढळून आले. यातील ५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणात पात्र असून ८ प्रकरणे ताकीदपात्र आहे. रासायनिक खताच्या ३२१ नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ नमुने अप्रमाणित आढळून आले.
खताच्या या अप्रमाणित नमून्यापैकी ८ नमुने ताकीदपात्र तर २५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणासाठी पात्र असल्याचे आढळून आले. संबंधिताविरोधात कार्यवाही करून सक्त ताकीद देण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षाअखेर कीटकनाशकांची ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पूर्णवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा परिषदस्तरावर अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक यांचे मिळून एकूण ३५ गुणनियंत्रण निरीक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात बियाण्यांची ३३६, रासायनिक खताचे ५६२ व कीटकनाशकाची २४९ मान्यताप्राप्त विक्री केंद्र आहेत. कृषी निविष्ठा गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदीत फसवणूक होऊ नये, यासाठी पथक कार्यरत असतात.