गेवर्धा परिसरात १६ तास भारनियमन; कृषिपंपधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:34+5:302021-08-19T04:40:34+5:30

गुरनोली-गेवर्धा विद्युत उपकेंद्रांतर्गत परिसराच्या २२ गावांतील कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जाताे. परंतु, मागील काही दिवसांपासून या फिडरवरून केवळ ८ ...

16 hours weight regulation in Gevardha area; Agricultural pump holders suffer | गेवर्धा परिसरात १६ तास भारनियमन; कृषिपंपधारक त्रस्त

गेवर्धा परिसरात १६ तास भारनियमन; कृषिपंपधारक त्रस्त

Next

गुरनोली-गेवर्धा विद्युत उपकेंद्रांतर्गत परिसराच्या २२ गावांतील कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जाताे. परंतु, मागील काही दिवसांपासून या फिडरवरून केवळ ८ तास विद्युत पुरवठा, तर १६ तास भारनियमन करण्यात येत असल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर्षी खरीप हंगामात अत्यंत कमी पाऊस येत असल्याने शेतकरी मोटारपंपद्वारे पिकाला पाणीपुरवठा करून पीक वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र, कृषिपंपासाठी दिवसातून १६ तास भारनियमन होत असल्याने पिकाला आवश्यक पाणीपुरवठा करणे शक्य नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन मंत्रालय स्तरावरून आदेश देत विशेष बाब म्हणून येथील भारनियमन रद्द करावे. तसेच २४ तास विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. निवेदन देताना माजी आमदार आनंदराव गेडाम, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर लांजेवार हजर हाेते.

180821\img-20210818-wa0064.jpg

उर्जा मंत्री नितिन राऊत याना निवेदन देताना उपस्थीत माजी आ गेडाम व अन्य

Web Title: 16 hours weight regulation in Gevardha area; Agricultural pump holders suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.