बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:43+5:30
यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. कला शाखेतील ७ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ११६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल यावर्षी जिल्ह्यात ८८.६६ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी हा निकाल ६८.८० टक्क्यांवर घसरला होता. यावर्षी त्यात जवळपास २० टक्क्यांनी (१९.८६) सुधारणा झाली आहे. देसाईगंज येथील महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या गायत्री सुधीर सोनटक्के या विद्यार्थिनीने ९६.७७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान पटकावला. तिच्यापेक्षा थोडे कमी गुण असलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या धीरज भोयर याने ९६.३० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर प्लॅटिनम ज्युबिली शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्टिना हेमानी हिला ९२.७६ गुण मिळाल्याने तिसºया स्थानी समाधान मानावे लागले.
यावर्षी फ्रेश विद्यार्थ्यांपैकी एकूण १२ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात १४४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर २११८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी घेतली आहे.
यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. कला शाखेतील ७ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ११६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.६२ आहे. वाणिज्य शाखेतील २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ विद्यार्थी प्राविण्य श्रैणीत, तर ६० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८९.०८ टक्के आहे. यावर्षी निकाल वाढल्यामुळे शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
१०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यातील १६ शाळा
प्लॅटिनम ज्युबिली शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (प्राविण्य श्रेणीत १४), मोहसीनभाई जव्हेरी कनिष्ठ महाविद्यालय वडसा (प्राविण्य श्रेणीत ४), डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालय आरमोरी (प्राविण्य श्रेणीत ३), शासकीय आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालय जिमलगट्टा (प्राविण्य श्रेणीत २), राजे धर्मराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आसरअली (प्रावीण्य श्रेणीत १) महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी, शहीद बाबुराव शेडमाके कनिष्ठ महाविद्यालय आमगाव (महल), श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, स्व.रमेशबाबू कनिष्ठ महाविद्यालय रेगडी ता.चामोर्शी, राजर्षी शाहू महाराज विज्ञान महाविद्यालय चामोर्शी, यशोदादेवी इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडसा, धनंजय स्मृती कला व कनिष्ठ महाविद्यालय बेतकाठी, ता.कोरची, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बामणी, संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय रंगयापल्ली, डिज्नेलँड इंग्लिश मिडियम स्कूल, सिरोंचा