दिवसभरात १५८ जणांनी कोरोनावर मात केल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २७९७८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २५०२३ वर पोहोचली आहे. तसेच सद्या २३०६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ६४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
११ नवीन मृत्यूमध्ये ५५ वर्षीय महिला नवेगाव, गडचिरोली, ६४ वर्षीय पुरुष आरमोरी, ५७ वर्षीय पुरुष देलोडा, ता. आरमोरी, ५५ वर्षीय पुरुष आष्टी, ता. चामोर्शी, ५८ वर्षीय पुरुष चालेवाडा, ता. अहेरी, ५० वर्षीय पुरुष आरमोरी, ७० वर्षीय पुरुष खेडेगाव, ता. कुरखेडा, ७२ वर्षीय पुरुष आरमोरी, ५३ वर्षीय पुरुष जीबगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर, ७९ वर्षीय पुरुष नवेगाव, गडचिरोली, १ नवजात शिशु वाको, ता. कोरची यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४४ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ८.२४ टक्के, तर मृत्युदर २.३२ टक्के झाला.
नवीन २४३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६०, अहेरी तालुक्यातील २१, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील ७, चामोर्शी तालुक्यातील २९, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील १७, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ६, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ३१, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये २६, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये २० जणांचा समावेश आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या १५८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १०१, अहेरी ७, आरमोरी ४, चामोर्शी २०, धानोरा ५, मुलचेरा ७, सिरोंचा ४, कोरची २, कुरखेडा ३ तसेच देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे.