सव्वादोन वर्षांत २ हजार ८५८ रूग्ण किडनी आजारग्रस्त
By admin | Published: March 10, 2016 02:17 AM2016-03-10T02:17:57+5:302016-03-10T02:17:57+5:30
संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढत असतांनाच शरिराच्या आंतरिक बिघाडामुळे रूग्णांची अधिक भर पडत असल्याचे विविध आजारांवरून अनेकदा स्पष्ट होत आहे.
जागतिक किडनी दिन : जिल्ह्यात दर महिन्यात दीडशेवर रूग्णांवर उपचार
गोपाल लाजूरकर गडचिरोली
संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढत असतांनाच शरिराच्या आंतरिक बिघाडामुळे रूग्णांची अधिक भर पडत असल्याचे विविध आजारांवरून अनेकदा स्पष्ट होत आहे. या किडनी आजाराचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात किडनी (मूत्रपिंड) आजाराचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जानेवारी २०१४ ते मार्च २०१६ या जवळपास सव्वादोन वर्षाच्या काळात जिल्ह्यात २ हजार ८५८ किडनी आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. रोगग्रस्त संपूर्ण रूग्ण सध्या उपचारादाखल आहेत.
उच्च रक्तदाब, मूत्रखडा, यासह विविध आजारांमुळे किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सदर आजार बळावू नये याकरिता खबरदारी घ्यावी. किडनी आजारावर औषधोपचार करतानांच पुनर्उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीनुसारही किडनी आजारावर वेळीच अंशत: नियंत्रण मिळविता येते. मात्र आजाराची तीव्रता अधिक वाढल्यास उपचार पद्धतीला रूग्ण योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ शकत नाही. प्रसंगी मृत्यूसुद्धा ओढवतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात किडनी आजारासाठी योग्य उपचार पद्धती उपलब्ध आहे.