४०० जणांनी केले रक्तदान

By admin | Published: April 30, 2017 12:43 AM2017-04-30T00:43:06+5:302017-04-30T00:43:06+5:30

निरंकारी मिशनचे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज इतर हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ देसाईगंज येथील ...

400 donated blood donation | ४०० जणांनी केले रक्तदान

४०० जणांनी केले रक्तदान

Next

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम : ६५ महिलांनी केले रक्तदान
देसाईगंज : निरंकारी मिशनचे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज इतर हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे ३३५ पुरूष व ६५ महिला असे एकूण ४०० निरंकारी भक्त व नागरिकांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ संघटनमंत्री विनायक सुरत्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, नानक कुकरेजा, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, पंचायत समिती उपसभापती गोपाल उईके, संत निरंकारी मंडळाचे नागपूर सेवा दल क्षेत्रीय संचालक रोशनलाल शर्मा, स्थानिक शाखेचे प्रमुख आसाराम निरंकारी, कुरखेडा शाखेचे माधवदास निरंकारी, रामलाल मोहनानी, हरिष निरंकारी, पंचायत समिती सभापती मोहन गायकवाड, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती दीपक झरकर, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील, राजेश जेठाणी, सचिन खरकाटे, गणेश फाफट, मेहमीदा पठाण, वर्षा कोकोडे, पं.स. सदस्य बौध्दकुमार लोणारे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, सदानंद कुथे, चांगदेव फाये, बबलू कुरेशी, खान, माजी नगराध्यक्ष महेश पापडकर, संतोष शामदासानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विनायक सुरत्ने यांनी निरंकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले रक्तदानाचे कार्य ईश्वरीय कार्य आहे, असे मार्गदर्शन केले. आमदार क्रिष्णा गजबे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून समर्पण भावनेने होत असलेल्या या सेवा कार्याची प्रशंसा केली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे सदस्य, रक्तपेढीचे कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय देसाईगंज, उपजिल्हा रूग्णालय आरमोरी, कुरखेडा, अहेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड, कोंढाळा, कोरची येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 400 donated blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.