महाविद्यालयस्तरावरच अडकले मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्तीचे ४२८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:59+5:302021-06-29T04:24:59+5:30

गडचिराेली : सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात काेेराेना लाॅकडाऊनमुळे शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेच्या ऑनलाइन कामात काही अडचणी आल्या. या अडचणीवर ...

428 applications for post-matric scholarships stuck at college level only | महाविद्यालयस्तरावरच अडकले मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्तीचे ४२८ अर्ज

महाविद्यालयस्तरावरच अडकले मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्तीचे ४२८ अर्ज

Next

गडचिराेली : सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात काेेराेना लाॅकडाऊनमुळे शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेच्या ऑनलाइन कामात काही अडचणी आल्या. या अडचणीवर मात करीत समाजकल्याण विभागाने नऊ हजारपेक्षा अधिक अर्ज निकाली काढले. अद्यापही महाविद्यालयस्तरावर एससी, ओबीसी व व्हीजेएनटीचे मिळून एकूण ४२८ अर्ज प्रलंबित आहेत.

भारत सरकार मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क याेजनेअंतर्गत ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. अनुसूचित जाती, इतर मागासर्ग व व्ही.जे.एन.टी. आदी प्रवर्गाच्या मिळून जवळपास १० हजार ९४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले. अर्जासाेबत अपलाेड केलेल्या दस्तावेजाची पडताळणी करून समाजकल्याण विभागाने ९ हजार ६६६ अर्ज निकाली काढले. उर्वरित ४२८ अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. काेराेना लाॅकडाऊनमुळे गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात उपस्थितीच्या आदेशामुळे सर्व लिपिक महाविद्यालयात नियमित जात नव्हते. विद्यार्थी महाविद्यालयात जात नव्हते. इंटरनेट कॅफे बंद हाेते. त्यामुळे महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्ती अर्ज अडकून पडल्याची माहिती आहे.

बाॅक्स...

एससी प्रवर्ग ओबीसी, व्हीजेेएनटी

किती अर्ज ऑनलाइन सादर केले - ३१५० - ६,९४४

समाजकल्याण विभागाने निकाली काढले - ३०७२ - ६,५९४

महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या - ७८ - ३५०

बाॅक्स...

एक महिन्याची मुदत

काेराेना लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने एक महिन्याची मुदत समाजकल्याण विभागाला दिली आहे. जुलै महिन्यात हे अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

काेट...

काेराेना लाॅकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद हाेती. परिणामी तालुकास्तरावरील महाविद्यालयात, तसेच नेट कॅफेमध्ये जाऊन वेळेवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे शक्य झाले नाही. विलंबाने आपण अर्ज सादर केला.

- प्रणय केरामी, विद्यार्थी.

..............

गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केला. मात्र, दस्तावेजामध्ये त्रुट्या आढळल्याने त्यात सुधारणा करून व सर्व दस्तावेज जाेडून नव्याने अर्ज सादर करावा लागला. मी शिष्यवृत्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

- प्रतीक्षा गेडाम, विद्यार्थिनी.

Web Title: 428 applications for post-matric scholarships stuck at college level only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.