रोहयोतून जिल्ह्यात ५८४ सिंचन विहिरी
By admin | Published: March 19, 2016 01:42 AM2016-03-19T01:42:21+5:302016-03-19T01:42:21+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय गामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाने गडचिरोली
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
महात्मा गांधी राष्ट्रीय गामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहीर उभारण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला आहे. रोहयोतून सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात आतापर्यंत ५८४ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. या सिंचन विहिरीवर मोटारपंप बसवून शेतकरी भाजीपाला व इतर पिके घेत आहेत. सिंचन सुविधा वाढविण्यासाठी नरेगाची ही योजना जिल्ह्यात चांगली लाभदायक ठरत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाकडून गडचिरोली जिल्ह्याला जुलै २०१५ ते जून २०१८ या तीन वर्षाकरिता एकूण अडीच हजार सिंचन विहिरीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सन २०१५-१६ वर्षाकरिता ७००, २०१६-१७ करिता ९०० व सन २०१७-१८ वर्षाकरिता ९०० सिंचन विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात ५८४ सिंचन विहिरी बांधून पूर्ण केल्या आहेत. नरेगा विभागाच्या वतीने सन २००९-१० ते २०१३-१४ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ६०५ सिंचन विहिरी बांधण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने २०१५-१६ या वर्षात नव्याने २३० सिंचन विहिरींना मंजुरी दिली. यापैकी १८४ सिंचन विहिरींचे काम सुरू आहेत.
४रोजगार हमी योजनेंतर्गंत शेतकरी लाभार्थ्यांना २ लाख ९० हजार रूपये अनुदानातून सिंचन विहीर बांधून दिली जाते. जिल्ह्यात सिंचन विहिरींचे काम जून २०१६ पर्यंत चालणार आहेत. उर्वरित साडेतीन महिन्यात जिल्ह्यात ५० वर सिंचन विहीर पूर्ण होणार आहेत. या कामांसाठी जि.प.च्या नरेगा विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर कार्यशाळा घेतल्या होत्या.
४रोजगार हमी योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागास वर्गातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. लाभार्थी शेतकरी हा बीपीएलधारक असावा, याशिवाय संबंधित लाभार्थ्यांकडे नरेगाचे जॉबकार्ड असणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधित लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींना ग्रामसभेची मंजुरीही असणे आवश्यक आहे.
पूर्ण झालेल्या सिंचन विहिरींचा अहवाल
तालुकाविहीर (दोन वर्षात)विहिरी (आतापर्यंत)
अहेरी४१४७
आरमोरी७०९३
भामरागड०२७
चामोर्शी१५५५
देसाईगंज७५१०१
धानोरा१८२१
एटापल्ली११८३२७
गडचिरोली४२४५
कोरची९३११७
कुरखेडा६०२३७
मुलचेरा२३७०
सिरोंचा२९४९
एकूण ५८४१,१८९