लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत विहीर व सिंचनाचे इतर साहित्य उपलब्ध करून दिले जातात. या अंतर्गत ६१० लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत लवकरच निधीचे वितरण केले जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर व इतर सिंचनाची साधने खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या दोन्ही योजनेंतर्गत ५ आॅगस्ट रोजी २५ सप्टेंबर या कालावधीत पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.सुमारे २ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत (क्षेत्रांतर्गत) १ हजार ११४, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरील ६५ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ३१९ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांसाठी सोडत काढण्यात आली.बिरसामुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गतसाठी १२ कोटी ४३ लाख १२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे. यातून ३८४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी (क्षेत्राबाहेरील) ५५ लाख ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे. या योजनेसाठी १९ लाभार्थ्यांची निवड झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. यातून २०७ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व लाभार्थ्यांना लवकरच निधीचे वाटप केले जाणार आहे.या साहित्यासाठी मिळणार अनुदानबिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरीलच्या लाभार्थ्यांसाठी विहिरीसाठी अडीच लाख रुपये, इनव्हेल बोअरसाठी २० हजार रुपय, पंप संचासाठी २० हजार रुपये, पाईप खरेदीसाठी ३० हजार रुपये, वीज जोडणी आकारसाठी १० हजार रुपये व ठिबक संच किंवा तुषार संचासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरीसाठी अडीच लाख रुपये, इनव्हेल बोअर, पंप संचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये व विद्युत जोडणी आकारासाठी १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
६१० लाभार्थ्यांना मिळणार विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:00 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर व इतर सिंचनाची साधने खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या दोन्ही योजनेंतर्गत ५ आॅगस्ट रोजी २५ सप्टेंबर या कालावधीत पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
ठळक मुद्देअंतिम यादी तयार : डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना