९५० नेत्र रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:12 PM2018-10-22T23:12:55+5:302018-10-22T23:13:08+5:30

राष्ट्रीय शहीद क्रांतीकारी वीर बाबुराव शेडमाके स्मृतीप्रित्यर्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हेडरी, आदर्श मित्र मंडळ पुणे, आधार सेवाभावी संस्था आलापल्ली यांच्या वतीने श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूरच्या सहकार्याने २१ आॅक्टोबर रोजी सूरजागड येथील सामाजिक गोटूल भवनात आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर घेण्यात आले.

9 50 eye patients check | ९५० नेत्र रुग्णांची तपासणी

९५० नेत्र रुग्णांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देसुरजागड येथे शिबिर : आदर्श मित्र मंडळ व पोलीस विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : राष्ट्रीय शहीद क्रांतीकारी वीर बाबुराव शेडमाके स्मृतीप्रित्यर्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हेडरी, आदर्श मित्र मंडळ पुणे, आधार सेवाभावी संस्था आलापल्ली यांच्या वतीने श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूरच्या सहकार्याने २१ आॅक्टोबर रोजी सूरजागड येथील सामाजिक गोटूल भवनात आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ९५० नेत्र रुग्णांची तपासणी करून यापैकी ६०० नेत्र रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत भोसले, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, हेडरी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सूदर्शन आवारी, डॉ.चेतन खुटेमाटे, डॉ.हेमंत पुट्टेवार, डॉ.भालचंद्र फाळके, डॉ.राजुरकर, डॉ.अनुपमा बिश्वास, डॉ.चरणजीतसिंग सलुजा, पोलीस उपनिरीक्षक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व अभिवादन करून आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. सदर आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी अस्थिरोग निदान, छातीचे विकार, बालरोग निदान, स्त्रीरोग निदान व वेळेवर येणाऱ्या इतर आजाराच्या रुग्णांची तपासणी करून औषधोपचार पुरविण्यात आला. यावेळी ५०० मुलींना समूपदेशन करून त्यांना सॅनेटरी पॅड्स मोफत वितरित करण्यात आले. ३०० अस्थिरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. ३५० बालक तसेच १५० छातीशी संबंधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. अस्थमा रुग्णांना मोफत इनहेलर वितरित करण्यात आले. यावेळी ३०० महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. परिसरातील २५० लोकांना मोफत सौरदिव्याचे वाटप करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागडसारख्या अतिदुर्गम भागातील लोकांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागपूर व चंद्रपूरसारख्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी केली. दुर्गम भागात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आल्याने या परिसरातील शेकडो लोकांनी औषधोपचाराचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ, आधार सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: 9 50 eye patients check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.