अंगणवाडी सेविकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:18 AM2019-07-13T00:18:07+5:302019-07-13T00:18:52+5:30

१ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत.

Aanganwadi sevikas hit | अंगणवाडी सेविकांची धडक

अंगणवाडी सेविकांची धडक

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन : सेवानिवृत्त झालेल्यांना घोषणेप्रमाणे अनुदान द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत. पात्र अंगणवाडी सेविकांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे अनुदान द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी गडचिरोली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे यांच्या मार्फत शासनाला पाठविले आहे.
चार वर्षाच्या कालावधीत एकाही अंगणवाडी सेविकेला लाभ मिळाला नाही. लाभाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या काही महिलांचा मृत्यू सुध्दा झाला आहे. १ आॅक्टोबर २०११ पासून केंद्र शासनाने मानधन वाढ घोषित केले आहे. नऊ महिन्यांचा कार्यकाळ उलटत चालला तरी अजूनपर्यंत वाढीव मानधन देण्यात आले नाही. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्या, थकीत प्रवास भत्ता द्यावा, वाढीव मानधनासह थकीत मानधन द्यावे, मोबाईलची सक्ती बंद करावी, आदी मागण्यांसाठी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. या आंदोलनात ५०० पेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी महिला संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, उज्वला उंदीरवाडे, कौशल्या गौरकार, कल्पना निमसरकार, छाया कागदेलवार, भारती रामटेके, ललिता केदार, सुशीला कार, ज्योती बेजंकीवार, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, आषा कोटांगले, उर्मिला गव्हारे, बेबी. श्रीनगरीवार, मालू कामदार, माया शेडमाके, माया नैनुरवार, विठाबाई हट, इंदूमती भांडारकर यांनी केले.

Web Title: Aanganwadi sevikas hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा