काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद व नगरपंचायत मुख्याधिकारी विशाल पाटील व कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रत्येक चौकात स्वतः फिरून पाहणी केली. विनामास्क फिरणाऱ्या लाेकांवर कारवाई केली, तसेच नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. राज्यात जमावबंदी असल्याने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने विनाकारण बाहेर पडू नये. वैद्यकीय व इतर आवश्यक सेवा वगळता नागरिकांनी गर्दी करू नये. आराेग्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद व मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी केले.
सिराेंचात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:36 AM