ओबीसींच्या लोकसंख्येची माहिती प्रशासनाने केली सुधारित

By Admin | Published: August 1, 2014 12:17 AM2014-08-01T00:17:11+5:302014-08-01T00:17:11+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास वर्गीय व इतर यांची लोकसंख्या प्रशासनाने शासनाकडे चुकीचीपाठविली होती. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली

The administration has updated the OBC population's population | ओबीसींच्या लोकसंख्येची माहिती प्रशासनाने केली सुधारित

ओबीसींच्या लोकसंख्येची माहिती प्रशासनाने केली सुधारित

googlenewsNext

पालकमंत्र्यांचे निर्देश : ओबीसी संघर्ष कृती समितीच्या प्रयत्नाला यश
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास वर्गीय व इतर यांची लोकसंख्या प्रशासनाने शासनाकडे चुकीचीपाठविली होती. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली व लोकसंख्या सुधारित करून पाठवा, अशी मागणीही केली होती. त्यानंतर प्रशासनाने २८ जुलै रोजी इतर मागास वर्गीय व इतरांची लोकसंख्या ५ लाख २८ हजार ९५३ असल्याचे शासनाला तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कळविले आहे. ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पाठपुराव्याचे हे यश आहे.
३ जुलै २०१४ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाने ओबीसी व इतर मागस वर्गीय यांच्या लोकसंख्येबाबतची माहिती पालकमंत्र्यांना चुकीची दिली होती. त्यानंतर याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. आता प्रशासनाने सुधारित पत्र काढून २८ जुलै २०१४ ला पालकमंत्र्यांना नवी माहिती दिली आहे. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. त्यापैकी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या ४ लाख २३ हजार २४४ व अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार ७४५ असून उर्वरित व इतर मागास प्रवर्ग व इतरांची लोकसंख्या ५ लाख २८ हजार ९५३ आहे. नुकत्याच झालेल्या मराठा कुटुंबाच्या सर्व्हेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यात मराठा कुटुंबाची लोकसंख्या १७ हजार १७८ आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २५ आॅक्टोबर २००२ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी गट क व गट ड (वर्ग ३ आणि ४) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या अन्वये सरळ सेवा भरतीसाठी अनुसूचित जाती १२ टक्के, अनुसूचित जमाती २४ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, विमुक्त जाती अ २ टक्के, भटक्या जमाती ब २ टक्के, भटक्या जमाती क २.५ टक्के, भटक्या जमाती ड १.५ टक्के, इतर मागास प्रवर्ग ६ टक्के आरक्षण ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांना निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविली आहे.

Web Title: The administration has updated the OBC population's population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.