व्यसनमुक्तीसाठी प्रशासकीय अधिकारी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:31+5:302021-08-19T04:40:31+5:30

देसाईगंजचे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष महले यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत व्यसनमुक्तीचा ...

Administrative officers rushed for de-addiction | व्यसनमुक्तीसाठी प्रशासकीय अधिकारी सरसावले

व्यसनमुक्तीसाठी प्रशासकीय अधिकारी सरसावले

Next

देसाईगंजचे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष महले यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत व्यसनमुक्तीचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी एस. एस.सलाम, पोलिस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल, जलसंधारण उपविभागीय अधिकारी एम.जी.बन्सोड, नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक महेश गेडाम, मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्ये, डाॅ. अशोक गहाणे, डाॅ. प्रणय कोसे, दिलीप कहुरके, विलास ढोरे, किशोर मेश्राम तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत स्थानिक गावपातळीवरील बचतगट व्यसनमुक्त करणे, शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त करणे, शहरातील सर्व किराणा दुकानांची आकस्मिक तपासणी करणे, गावातील तसेच शहरातील कोविड लसीकरण जनजागृती करुन वाढविणे, कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई करणे, शाळा बाह्य शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होता कामा नये, यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक आणि शहरी भागात नगर प्रशासन कारवाई करणार, शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

180821\img-20210813-wa0088.jpg

तहसिलदार यांचे दालनात अधिकारी यांची बैठक

Web Title: Administrative officers rushed for de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.