परप्रांतीय १२ शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:34 AM2021-03-28T04:34:24+5:302021-03-28T04:34:24+5:30
या सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील येंकापल्ली येथील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या १२ मुलांना वयानुरुप त्यांचे ...
या सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील येंकापल्ली येथील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या १२ मुलांना वयानुरुप त्यांचे वर्गात गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार प्राप्त विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे (भोयर) यांनी शिक्षकांच्या मदतीने पालकांशी संवाद साधत त्याना शिक्षणाचे महत्व पटवून देत शाळेत दाखल करुन घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करीत या सर्व विद्यार्थ्यांना कपडे व नोट बुक,पेन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचे हस्ते वितरित करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक प्रकाश दुर्गे यानीही मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक प्रकाश दुर्गे, विषय साधन व्यक्ती किशोर मेश्राम, ज्ञानेश्वर कापगते, सुषमा खराबे, मुख्याध्यापिका.ए.बी.बारसागडे, शिक्षीका बेबी झीलपे, के.आय.शेख आदी उपस्थित होते. छतीसगढ राज्यातील रायपुर व बीलासपुर येथील पाच कुटुंब विटाभट्टीचे काम करण्यासाठी येंकापल्ली येथील नाल्यावर आपल्या परिवारासह मागील तीन महिन्यापूर्वीच आली. त्यांचेसोबत शाळा शिकणारी मुले सुद्धा आलीत. याबाबतची माहिती मुख्याध्यापिका ए.बी.बारसागडे यांना सर्वेक्षणात आढळुन आली. त्यानी बालरक्षक, विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांचेशी संपर्क साधून या ठिकाणच्या बाराही मुला-मुलींना इयत्ता पहिली ते पाचवीत लगेच शाळेत दाखल करुन घेतले. मुलांना शाळेत तर दाखल केलेत पण आता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. ते नियमीत शाळेत येतील व शाळेत टिकतील व शाळा शिकतील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी केले. या बाराही मुलांना शासनातर्फे शालेय गणवेश येत्या दोन तीन दिवसात उपलब्ध करून देण्याचे गटशिक्षणाधिकारी आश्वासन निर्मला वैद्य यांनी दिले.
कोट..
.सूक्ष्म सर्वेक्षणातून तालुक्यात जेवढी मुले शाळाबाह्य आढळली. त्या सर्वांना शाळेत दाखल करण्यात येत आहेत. उमानुर केंद्रात दोन शाळाबाह्य मुलांना त्यांचे वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल करण्यात आली. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची सर्वजण काळची घेत आहेत. आपण सर्व बालरक्षक आहोत म्हणून बालकांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
किशोर गज्जालवार,संवर्ग विकास अधिकारी, प.स.अहेरी.