वकिलांनीही मागितला स्वतंत्र विदर्भ
By admin | Published: November 15, 2014 10:47 PM2014-11-15T22:47:22+5:302014-11-15T22:47:22+5:30
गडचिरोली अधिवक्ता संघ व जिल्हा सत्र न्यायालय बार असोसिएशनच्यावतीने १४ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. गडचिरोली येथे झालेल्या या बैठकीच्या
गडचिरोली : गडचिरोली अधिवक्ता संघ व जिल्हा सत्र न्यायालय बार असोसिएशनच्यावतीने १४ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. गडचिरोली येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद बोरावार होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीहरी अने व विदर्भ कनेक्ट संघटनेचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ उपस्थित होते.
अॅड. श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिका विषद करत १८५० पासूनच्या आंदोलनाची माहिती उपस्थित वकिलांनी दिली. विदर्भावर आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी अन्याय करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे विदर्भ मागास राहिला. विदर्भ कधीही महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा भाग नव्हता, असेही त्यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले. त्यानंतर गडचिरोली बार असोसिएशनच्यावतीने सर्व वकिलांनी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाला अॅड. प्रमोद बोरावार, अॅड. व्ही. के. न्यालेवार, अॅड. राम मेश्राम, अॅड. कविता मोहरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर स्वंतत्र विदर्भ राज्याच्या बाबतचा ठराव पारित करून त्याची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मान्यवर वकिलांनीही कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)