अखेर मगराला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:19 PM2019-06-16T22:19:30+5:302019-06-16T22:20:02+5:30
शहरातील पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या गाव तलावात मगर आढळून आला होता. १४ जूनपासून दिवसभर तलावामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मगराला पकडण्यात यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शहरातील पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या गाव तलावात मगर आढळून आला होता. १४ जूनपासून दिवसभर तलावामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मगराला पकडण्यात यश मिळाले आहे.
पकडलेला मगर पाच फूट लांबीचा आहे. वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सदर मगर वैनगंगा व पोहोर या दोन नद्यांचा संगम असलेल्या नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यावेळी क्षेत्र सहायक आर. डी. तोकला, विठ्ठल मेश्राम, पी. डी. राठोड, ए. ए. वैरागडे, प्रकाश राजुरकर, एन. डी. सोळंखी, संदीप सहारे, केशव राऊत, संदीप शिंदे, वैभव वाघाडे, मुखरू सातारे, अजय भंडारे, आशिष कस्तुरे, रामदास गोवारे, बबन सरपे, संतोष भंडारे, विश्वनाथ वाघाडे, विजय वासेकर, दिलीप कस्तुरे, चंदू कस्तुरे, राकेश सोमनकर, मंगेश अलिवार, प्रथम पुठ्ठावार आदी उपस्थित होते. मगर पकडल्याने चामोर्शीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नागरिक आता भयमुक्त झाले आहेत.