ऑनलाईन लोकमतभामरागड : तालुक्यातील डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी सदिच्छा भेट दिली. प्रकल्पातील कार्य पाहून भारावून गेल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.सीआरपीएफ कॅम्पमधील कार्यक्रमासाठी अहीर यांचे भामरागड येथे सकाळी १०.२० वाजता आगमन झाले. १०.३० वाजता ते हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात आले. यावेळी त्यांनी खासदार अशोक नेते यांच्यासह पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी आमटे कुटुंबातील डॉ.मंदाकिनी आमटे, डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे यांच्याशीही त्यांनी हितगुज केले. यावेळी अहीर यांनी लोकबिरादरी प्रकल्पातील प्राणी अनाथालय, सौर ऊर्जा वापर प्रकल्प, संगणक कक्ष, सुसज्ज वसतिगृह, आश्रमशाळेतील उपक्रम, गोटुल, रुग्णालय आदींची माहिती घेऊन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
‘लोकबिरादरी’ला अहीर यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:10 AM
तालुक्यातील डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी सदिच्छा भेट दिली. प्रकल्पातील कार्य पाहून भारावून गेल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ठळक मुद्देडॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी सदिच्छा भेट