शिक्षणासाठी योगिताची अमेरिकेत झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:21 PM2019-08-04T23:21:11+5:302019-08-04T23:21:29+5:30

महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या व विकासापासून कोसोदूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील योगीता मारोतराव वरखडे या विद्यार्थिनीने पीएचडीसाठी थेट अमेरिकेत झेप घेतली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकलेली एक विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी पहिल्यांदा अमेरिकेला जात आहे, ही गोष्ट जिल्हावासियांसाठी भूषणावह ठरली आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने योगिताला शिष्यवृत्ती मंजूर केली असून तिचा सर्व खर्च या विभागाकडून केला जाणार आहे.

America's leap in education for yoga | शिक्षणासाठी योगिताची अमेरिकेत झेप

शिक्षणासाठी योगिताची अमेरिकेत झेप

Next
ठळक मुद्देपीएचडीसाठी जाणार : आदिवासी विकास विभागाने दिले शिष्यवृत्तीच्या रूपात पंख

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या व विकासापासून कोसोदूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील योगीता मारोतराव वरखडे या विद्यार्थिनीने पीएचडीसाठी थेट अमेरिकेत झेप घेतली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकलेली एक विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी पहिल्यांदा अमेरिकेला जात आहे, ही गोष्ट जिल्हावासियांसाठी भूषणावह ठरली आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने योगिताला शिष्यवृत्ती मंजूर केली असून तिचा सर्व खर्च या विभागाकडून केला जाणार आहे.
दुर्गम भागातील कारवाफा येथील शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या योगिताचा प्रवास प्रेरणादायी आहे. माध्यमिक शिक्षण तिने गडचिरोली येथील जि.प. हायस्कूलमध्ये तर विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. नागपूर येथे बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्ष ती दिल्लीला सिव्हील सर्व्हिसेसच्या अभ्यासासाठी व्यस्त होती. सोबतच नागपूर विद्यापीठात मॉलेकुलर बॉयोलॉजी व जेनेटिक इंजिनिअरींग विषयात तिने पदव्युत्तर पदवी घेतली. अमेरिकेतील मिशिगन टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसीटीमध्ये ती पीएचडी करणार आहे. एसटीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबतची योजना २००५-०६ पासून आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ योगिताला मिळाला आहे. तिचे शिक्षण व राहण्याचा खर्च आदिवासी विकास विभाग उचलणार आहे. योगीताने गुरूवारी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. शिष्यवृत्तीसाठी गडचिरोलीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत योगिताने प्रस्ताव सादर केला होता. प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. एपीओ विकास राचेलवार यांनीही तिला मार्गदर्शन केले.
आदिवासींची सेवा करण्याचा निर्धार
पाच वर्षे अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार योगिताने व्यक्त केल्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सुधीर शेंडे यांनी सांगितले. आई गणितासह वडील, तीन बहिणी, भाऊजी, भाऊ, डॉ.भास्कर हलामी यांचे सातत्याने तिला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी आपले ध्यैर्य ढासळू दिले नाही. आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली, अशी प्रतिक्रिया योगिताने दिली आहे.

Web Title: America's leap in education for yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.