कुरखेडा तालुक्यात महिला बचत गट, महिला उत्पादक गट, महिला ग्रामसंघ आहेत. हे समूह विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. संगिनी ग्राम संघ रामगड / पुराडा येथे सीताफळ, जांभूळ यांवर प्रक्रिया करून त्यापासून पल्प काढला जातो. तसेच आवळ्यापासून कँडी, मुरंबा, आवळा सुपारी तयार केली जाते. जांभूळखेडा येथे चारोळी प्रक्रिया केंद्र, मालदुगी येथे मध संकलन व प्रक्रिया केंद्र, बेलगाव येथे आंबाडीपासून जॅम, जेली, चटणी, आंबाडी पावडर, आदी पदार्थ तयार केले जातात. या सर्व प्रकल्पांना सहायक जिल्हाधिकारी मृगनाथनम यांनी तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापिका चेतना लाटकर यांनी भेट देऊन प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील व्यवस्थापक अशपाक शेख, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कुरखेडा येथील तालुका चमू, रामगड, पुराडा, जांभूळखेडा, बेलगाव येथील सरपंच, ग्रामसेवक तथा ग्रामसंघाच्या महिला उपस्थित हाेत्या.
सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी जाणले ‘उमेद’चे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:25 AM