मार्र्कं डा विकासासाठी एक कोटी देण्याचे आश्वासन
By admin | Published: March 9, 2016 02:30 AM2016-03-09T02:30:16+5:302016-03-09T02:30:16+5:30
मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
आत्राम यांची घोषणा : केंद्रीय मंत्री व पालकमंत्र्यांचा सत्कार
मार्कंडादेव : मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी शाल, श्रीफळ देऊन अम्ब्रीशराव आत्राम यांचा सत्कार केला. यावेळी खा. अशोक नेते, ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज पालारपवार, मृत्यूंजय गायकवाड, पा. गो. पांडे, रामू तिवाडे, रोशनी वरघंटे, स्वप्नील वरघंटे, उज्ज्वल गायकवाड, आनंद गण्यारपवार, संवर्ग विकास अधिकारी बादलशाहा मडावी, जि. प. चे माजी अध्यक्ष रवी ओल्लालवार उपस्थित होते.
दुपारी ११ वाजताच्या सुमारास केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आ. देवराव होळी हजर होते. यावेळी मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गंगाधर कोंडुकवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार सचिव मृत्युंजय गायकवाड, रामू तिवाडे, उज्ज्वल गायकवाड उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री आत्राम म्हणाले की, मार्र्कंडा मंदिर परिसर, चपराळा मंदिर परिसर विकासासाठी जिल्हा विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील. मार्कंडा यात्रेसाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, यातून नदीपात्रात बोटिंग, मंदिर परिसराची स्वच्छता, गावातील रस्ते व नदीपात्रातील स्वच्छता, यात्राकाळातील घाण स्वच्छ करणे आदी बाबींवर हा पैसा खर्च करता येईल, असे सांगितले. मार्र्कंडादेव व इतर देवस्थानाच्या विकासाकरिता ४ कोटी ७५ लाख रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)