पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलजागृतीची गरज
By admin | Published: March 18, 2016 01:31 AM2016-03-18T01:31:52+5:302016-03-18T01:31:52+5:30
जलसाठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर पाणी अडवून जलस्त्रोत वाढविण्याची गरज असतांनाच पाण्याचा काटकसरीने वापर करणेही गरजेचे आहे.
नामदेव सोनटक्के यांचे प्रतिपादन : घोट येथे जनजागृती रॅली व मार्गदर्शन
घोट : जलसाठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर पाणी अडवून जलस्त्रोत वाढविण्याची गरज असतांनाच पाण्याचा काटकसरीने वापर करणेही गरजेचे आहे. शिवाय योग्य नियोजन करून जलस्त्रोत वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के यांनी गुरूवारी केले.
लघु पाटबंधारे सिंचाई शाखा घोटच्या वतीने जलजागृती अभियानांतर्गत रॅली व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामदेव सोनटक्के अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून लघु पाटबंधारे शाखा घोटचे कनिष्ठ अभियंता व्ही. जी. आदेवार, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, ग्रा. पं. सदस्य अर्कपटलवार, गिरीष उपाध्ये, मन्साराम पिपरे, हेमंत उपाध्ये, ऋषी कोडापे, सुभा कांबळे, दिनकर लाकडे उपस्थित होते. जलजागृती प्रभावीपणे राबवून पाण्याची बचत करावी, असे आवाहन कनिष्ठ अभियंता आदेवार यांनी केले. संचालन ए. पी. गुज्जलवार तर आभार डी. एस. बोबाटे यांनी मानले.