शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
7
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
8
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
9
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
10
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
11
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
12
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
13
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
14
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
15
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
16
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
17
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
18
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
19
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
20
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलजागृतीची गरज

By admin | Published: March 18, 2016 1:31 AM

जलसाठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर पाणी अडवून जलस्त्रोत वाढविण्याची गरज असतांनाच पाण्याचा काटकसरीने वापर करणेही गरजेचे आहे.

नामदेव सोनटक्के यांचे प्रतिपादन : घोट येथे जनजागृती रॅली व मार्गदर्शनघोट : जलसाठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर पाणी अडवून जलस्त्रोत वाढविण्याची गरज असतांनाच पाण्याचा काटकसरीने वापर करणेही गरजेचे आहे. शिवाय योग्य नियोजन करून जलस्त्रोत वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के यांनी गुरूवारी केले. लघु पाटबंधारे सिंचाई शाखा घोटच्या वतीने जलजागृती अभियानांतर्गत रॅली व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामदेव सोनटक्के अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून लघु पाटबंधारे शाखा घोटचे कनिष्ठ अभियंता व्ही. जी. आदेवार, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, ग्रा. पं. सदस्य अर्कपटलवार, गिरीष उपाध्ये, मन्साराम पिपरे, हेमंत उपाध्ये, ऋषी कोडापे, सुभा कांबळे, दिनकर लाकडे उपस्थित होते. जलजागृती प्रभावीपणे राबवून पाण्याची बचत करावी, असे आवाहन कनिष्ठ अभियंता आदेवार यांनी केले. संचालन ए. पी. गुज्जलवार तर आभार डी. एस. बोबाटे यांनी मानले.