मुनघाटे महाविद्यालयातर्फे लसीकरणाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:59+5:302021-05-24T04:35:59+5:30
मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाद्वारे ही मोहीम मागील आठवड्यापासून राबविण्यात येत आहे. तालुक्यातील घाटी, तळेगाव, नान्ही, धमदीटोला आदी गावात ही ...
मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाद्वारे ही मोहीम मागील आठवड्यापासून राबविण्यात येत आहे. तालुक्यातील घाटी, तळेगाव, नान्ही, धमदीटोला आदी गावात ही मोहीम राबविण्यात आली. माेहिमेद्वारे लसीकरणाची गरज, महत्त्व, लस केव्हा घ्यायची, काळजी, लस कोण घेऊ शकताे व काेण घेऊ शकत नाही. दोन डोसमधील दिवसांचा फरक याबाबत माहिती देऊन ग्रामीण भागात लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रासेयो पथकाच्या स्वयंसेवकांनी मोहीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात राबविली. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुणवंत वडपल्लीवार, स्वयंसेवक साधना कामडी, राहुल बुद्धे, गायत्री सयाम, प्रतीक्षा लाडे, लायबा काद्री, वैष्णवी लांजेवार, हर्षिता वाडेकर यांनी राबविली. यासाठी नान्हीचे सरपंच चंद्रभान हुंडरा, धमदीटोला जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गुलाब सोनकुकरा, सहायक शिक्षक नयना कोरगंटीवार यांचे सहकार्य लाभले.
===Photopath===
230521\img-20210512-wa0100.jpg~230521\23gad_6_23052021_30.jpg
===Caption===
ग्रामस्थांची भेट घेत लसीकरणाकरीता जनजागृति करताना मूनघाटे महाविद्यालयाचे रासेयो पथक~लसीकरणाबाबत जनजागृती करताना मुनघाटे काॅलेजचे स्वयंसेवक.