५१ शेतकऱ्यांना बैलबंडीचे वाटप
By admin | Published: November 15, 2014 01:40 AM2014-11-15T01:40:54+5:302014-11-15T01:40:54+5:30
अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला.
अहेरी : अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवनी गावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. कृषी सभापती अजय कंकडालवार, कृषी समिती सदस्य नंदा दुर्गे, पं. स. सदस्य, रामेश्वरबाबा आत्राम, सुखदेव दुर्याेधन, किष्टापूरचे सरपंच आत्माराम गद्देकर, वेलगुरचे उपसरपंच अशोक येलमुले, लालुजी करपेत उपस्थित होते.
अहेरी पंचायत समितीतील ३० गावांना २०१३-१४ मध्ये मंजुर झालेल्या ११८ लोखंडी बैलगाड्यांपैकी ५१ बैलगाड्यांचा वाटप करण्यात आले आहे. यापैकी गडअहेरी, बाम्हणीतील ४ लाभार्थ्यांना बैलबंडी वितरीत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा कृषी विकास अधिकारी राजपूत, कापसे, सवंर्ग विकास अधिकारी पी. चांदेकर उपस्थित होते. दरम्यान जि. प. सभापती अजय कंकडालवार यांचा पं. स. च्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी पी. पी. पदा यांनी केले. पदा यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन हिवराज मेश्राम यांनी केले. यावेळी पं. स. तील कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)