सावधान । जिल्ह्यात तीन दिवसात कोरोनाची सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:36 AM2021-04-06T04:36:11+5:302021-04-06T04:36:11+5:30

सोमवारी ७३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत बाधित झालेल्यांची ...

Be careful. Seven victims of corona in three days in the district | सावधान । जिल्ह्यात तीन दिवसात कोरोनाची सात बळी

सावधान । जिल्ह्यात तीन दिवसात कोरोनाची सात बळी

Next

सोमवारी ७३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ११०५० वर पोहोचली आहे. तसेच १०३२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ११८ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ६१० सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

सोमवारी नोंद घेतलेल्या तीन नवीन मृत्यूमध्ये दोन चंद्रपूर जिल्ह्यातील असून एक ६० वर्षीय महिला तर दुसरी ६७ वर्षीय महिला आहेत. याशिवाय आलापल्ली येथील एका ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.५२ टक्के आहे.

नवीन ७३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४८, आरमोरी १, चामोर्शी २, धानोरा तालुक्यातील १, कोरची २, कुरखेडा २, मुलचेरा १, सिरोंचा १४, तसेच वडसा तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ३६ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १६, अहेरी ५, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी १, धानोरा १, एटापल्ली २, सिरोंचा १, कुरखेडा २, आणि देसाईगंजमधील ३ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांत गडचिरोली तालुक्यातील रामनगर २, रेड्डी गोडाऊन चौक १, लांजेडा १, साईनगर २, वनश्री कॉलनी ४, अयोध्यानगर ५, मेडिकल कॉलनी ४, सुभाष वाॅर्ड २, मौशीखाम १, सर्वोदय वाॅर्ड १, शेडमाके चौक १, कन्नमवार वाॅर्ड ४, नवेगाव ३, रेव्हेन्यू कॉलनी १, रामराज भवन १, कलेक्टर कॉलनी १, सरकार नगर २, सीआरपीएफ १, स्नेहनगर १, बजाज शोरूमच्या मागील एका जणाचा समावेश आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील स्थानिक २, मोयाबिनपेठा २, नेमाडा १०, तर देसाईगंज तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वाॅर्ड १, अकापूर १, आणि इतर जिल्ह्यातील ५ बाधितांचा समावेश आहे.

दोन सभागृहांना ५ हजारांचा दंड

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासंदर्भात जाहीर केलेल्या निर्बंधानुसार लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तीं आढळल्यास संबंधित जागा (हॉल) मालकावर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार दि.५ रोजी गडचिरोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सभागृह, मंगल कार्यालयांना भेटी दिल्या असता सुप्रभात व सुमानंद सभागृहात कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लग्न समारंभात गर्दी आणि अनेकांनी मास्क, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केलेले नव्हते. त्यामुळे दोन्ही सभागृह चालकांवर प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावून पुन्हा असा प्रकार घडल्यास ३० दिवसांकरिता सभागृह सील करण्याची ताकीद देण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या मार्गदर्शनात स्नेहल शेंद्रे, वैभव कागदेलवार, शरद मार्तीवार आणि गुरू बाळेकरमरकर यांनी केली.

Web Title: Be careful. Seven victims of corona in three days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.