आता महिनाभर दाढी-कटिंग घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:22+5:302021-04-08T04:37:22+5:30
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता दुसऱ्यांदा सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे शासन व प्रशासनाकडून आदेश निघाले. या ...
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता दुसऱ्यांदा सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे शासन व प्रशासनाकडून आदेश निघाले. या आदेशामुळे गडचिराेली शहरासह जिल्ह्यातील केश कर्तनालये व सलून दुकाने बंद राहणार आहेत. सलून व्यावसायिकांवर माेठे संकट काेसळले असून, आता नागरिकांनाही महिनाभर दाढी, कटिंग घरीच करावी लागणार आहे.
मार्च २०२० पासून काेराेना महामारीचे संकट राज्यावर आले. दरम्यान, पाच ते सहा महिने सलूनची दुकाने बंद हाेती. दरम्यान, संसर्ग आटाेक्यात आल्यानंतर ऑक्टाेबर २०२० पासून सलूनची दुकाने पुन्हा सुरू झाली. मात्र, शासन व प्रशासनाच्या नव्या आदेशाने आता सलूनची दुकाने पुन्हा महिनाभर बंद राहणार आहेत.
गडचिराेली शहरात जवळपास १६७ सलूनची दुकाने आहेत. माेठ्या दुकानांमध्ये चार ते पाच कारागीर काम करीत आहेत. लहान दुकानांमध्ये एक ते दाेन कारागीर काम करीत आहेत. गडचिराेली जिल्ह्यात या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे हजाराे कारागीर आहेत. काेराेनामुळे या कारागिरांवर आर्थिक संकट काेसळले आहे.
बाॅक्स....
दुकान व घर भाडे थकणार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून, तसेच शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक सलून व्यावसायिक, तसेच नाभिक समाजबांधव राेजगार मिळविण्यासाठी गडचिराेली जिल्हा मुख्यालय काही वर्षांपूर्वी आले. भाडे तत्त्वावर दुकानाची खाेली घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. काही जणांचे स्वत:चे घर असून, बरेचजण भाड्याच्या खाेलीमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहे. काेराेना संकटामुळे दुसऱ्यांदा दुकाने बंद राहून राेजगार हिरावला आहे. परिणामी आता दुकान व घराचे भाडे थकणार आहे.
काेट...
यावर्षी काेराेनामुळे पाच ते सात महिने सलूनची दुकाने बंद हाेती. दुकानभाडे, वीज बिल व घर खर्च भागविण्यासाठी कसरत करावी लागली. दरम्यान, काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू हाेऊन व्यवसाय पूर्वपदावर आला. मात्र, आता पुन्हा दुकान बंदने संकट ओढवले.
- रमेश भंडारे, सलून व्यावसायिक
काेट...
माझ्या व माझ्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केश कर्तनालयाच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. दिवसभर दाढी-कटिंग करून प्राप्त मिळकतीतून खर्च भागविला जाताे. आता काेराेनामुळे संकट आले आहे. शासनाने व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी.
- सचिन मेंडुलकर, सलून व्यावसायिक
काेट...
काेराेना संसर्ग महामारीमुळे यापूर्वी पाच ते सहा महिने सलूनची दुकाने बंद हाेती. आता पुन्हा काेराेनाची दुसरी लाट आली असून, दुकान बंदचा आदेश निघाला आहे. आमच्या राेजीराेटीचा माेठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन, प्रशासनाने दुकानभाडे व घर खर्चासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.
- हरिश कडूकर, अध्यक्ष, नाभिक समाज शहर संघटना गडचिराेली.