भारत ही बुद्धाची भूमी असून बौद्ध धम्माची शिकवण मानवी कल्याणाची आहे. धम्माच्या नीतीमूल्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगल्यास आपले कल्याण होईल, असे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी केले. गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व या विषयावर सी. पी. शेंडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सरचिटणीस तुलाराम राऊत यांनी परित्राणपाठ व बुध्दवंदना घेतली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले. कवडू उंदीरवाडे, बाळकृष्ण बांबोळे, हंसराज उंदीरवाडे यांनीही संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. ही प्रवचन मालिका ऑक्टोबर महिना अश्विन पौर्णिमापर्यंत चालणार असून धम्मा संबंधीच्या विविध विषयावर बौद्धाचार्य,केंद्रीय शिक्षक प्रबोधन करणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस तुलाराम राऊत, प्रास्ताविक कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे तर आभार कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे यांनी मानले. यावेळी विशाखा महिला मंडळ, सम्यक समाज समिती,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना खीर व फळदान करून सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
वर्षावासनिमित्त धम्म प्रबाेधनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:33 AM