काेराेनामुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबांना मिळाले लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:50+5:302021-07-10T04:25:50+5:30
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देय असलेल्या लाभासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ...
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देय असलेल्या लाभासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष लक्ष घातले. त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करण्याचे आदेश दिले. आजपर्यंत ३३ पैकी ३२ कर्मचान्यांचे पेन्शन व उपदान मंजूर झालेले आहे. सदर रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. मृत कर्मचारी ज्या कार्यालयांतर्गत कार्यरत होते. त्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्राधान्य देऊन तत्काळ सदर प्रकरणांचा निपटारा केला. या कामामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष लक्ष दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) फरेंद्र कुतीरकर, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी उमेश गायकवाड, आशिष गामोटकर, नरेश कनोजिया, नि. के. सोनकुसरे, कुस्मो चिचेकर यांनी प्रकरणे मंजूर करण्यासाठी मदत केली.
काेट
काेराेनाकाळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:ख कोसळले होते. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे देय असलेले लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.