भाजपची जिल्हा कार्यकारिणी गठित

By Admin | Published: March 9, 2016 02:35 AM2016-03-09T02:35:26+5:302016-03-09T02:35:26+5:30

भारतीय जनता पार्टीच्या जम्बो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी मंगळवारी केली.

BJP's district executive committee constituted | भाजपची जिल्हा कार्यकारिणी गठित

भाजपची जिल्हा कार्यकारिणी गठित

googlenewsNext

३ सरचिटणीस, १० उपाध्यक्ष, सचिव यांची झाली निवड
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या जम्बो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी मंगळवारी केली.
या कार्यकारिणीत तीन सरचिटणीसासह १० उपाध्यक्ष व सचिव यांचीही वर्णी लावण्यात आली आहे. सरचिटणीसपदी रवींद्र बावनथडे, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार तर जिल्हा उपाध्यक्षपदी रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी, दामोदर अरगेला, मोतीलाल कुकरेजा, अनिल पोहणकर, रेखा डोळस, बाबुराव गंपावार, प्रकाश अर्जुनवार, सदानंद कुथे, डॉ. बळवंत लाकडे यांची वर्णी लागली आहे तर सचिवपदी आनंद भांडेकर, संजय साळवे, विलास गावंडे, डॉ. शैलेंद्र बिसेन, विनोद आकनपल्लीवार, सुनील बिश्वास, लता पुंगाटी, सुभाष गणपती, मनोज पालारपवार, नामदेव सोनटक्के यांना स्थान देण्यात आले आहे. कोषाध्यक्ष म्हणून नंदकिशोर काबरा तर कार्यकारिणीवर कायम निमंत्रक म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, किसन नागदेवे, बाबुराव कोहळे यांची वर्णी लावण्यात आली. विशेष निमंत्रित म्हणून प्रमोद पिपरे, नाना नाकाडे, अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांना स्थान देण्यात आले आहे. राज्य परिषद सदस्य म्हणून नामदेव शेंडे, रामभाऊ पडोळे, सत्यनारायण मंचर्लावार यांची वर्णी लावण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

आघाड्यांचेही झाले गठन
भाजप युमोच्या जिल्हा अध्यक्षपदी स्वप्नील वरघंटे, सरचिटणीसपदी भारत बावनथडे, चेतन गोरे, सतीश गोटमवार, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ताराबाई कोटांगले, सरचिटणीसपदी सुनीता ठेंगरी, मालू तोडसाम यांची वर्णी लावण्यात आली आहे. दलित आघाडीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डी. के. मेश्राम, सरचिटणीसपदी गिरीधर मेश्राम, देवराव गजभिये, आदिवासी आघाडी अध्यक्षपदी प्रकाश गेडाम, सरचिटणीसपदी दीपक फुलसंगे, सुधाकर नाईक, सुभाष नैताम, सहकार आघाडी अध्यक्षपदी विजय पालारपवार, सरचिटणीसपदी अनंत साळवे, ओबीसी आघाडी अध्यक्षपदी रवीकिरण समर्थ, सरचिटणीसपदी भास्कर बुरे, रवी बोमनवार, किसान आघाडी अध्यक्षपदी रमेश भुरसे यांची वर्णी लावण्यात आली आहे.

Web Title: BJP's district executive committee constituted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.