गडचिरोलीतील शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सकाळी १० वाजता ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार प्रामुख्याने उपस्थित राहतील. या शिबिरात जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तथा नागरिक सहभागी होऊन रक्तदान करणार आहेत.
याशिवाय एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्रात ११ जुलैला सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह बुर्गीचे ठाणेदार कैलास आलुरे, बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कन्नाके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अहेरीत १३ रोजी शिबिराचे आयोजन
- अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.१३ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी लोकमत सखी मंच, वेलकम फाउंडेशन, कर्तव्य फाउंडेशन, आलापल्ली व्यापारी संघटना, माँ विश्व भारती सेवा संस्था, पोलीस विभाग, वन विभाग, एफडीसीएम, सीआरपीएफ बटालियन आदींनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार ओंकार ओतारी राहणार आहेत.
- शिबिराचे उद्घाटन सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडंट राजेश्वर बाळापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, प्राचार्य गजानन लोनबले उपस्थित राहणार आहेत.
- या शिबिराच्या आयोजनासाठी लोकमत आलापल्ली प्रतिनिधी प्रशांत ठेपाले, अहेरी प्रतिनिधी विवेक बेझलवार, प्रतीक मुधोळकर, सखी मंच संयोजिका वैशाली देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.
कोण करू शकतो रक्तदान
- १८ ते ६० वयोगटातील ४५ किलोपेक्षा जास्त वजन असणाऱ्या महिला आणि ५० किलोपेक्षा जास्त वजन असणारे पुरुष रक्तदान करू शकतात.
- कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोज घेतल्यानंतर १५ दिवसांनी रक्तदान करता येते, तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर एक महिन्यानंतर रक्तदान करता येते.
- दर तीन महिन्यांतून एकदा असे वर्षातून चार वेळा कोणत्याही सुदृढ व्यक्तीला रक्तदान करता येते.