बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:18 AM2019-01-20T01:18:06+5:302019-01-20T01:19:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : येथील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे तीन टॉवर व कार्यालयाचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे ...

BSNL's power supply disrupted | बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित

बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित

Next
ठळक मुद्दे२ लाख ५६ हजारांचे बिल थकीत : दोन टॉवरची दूरसंचार सेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : येथील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे तीन टॉवर व कार्यालयाचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. परिणामी दोन टॉवरवरील बीएसएनएल सेवा प्रभावित झाली आहे. बीएसएनएलने वीज बिल न भरल्यामुळे १७ जानेवारीपासून टॉवर व कार्यालयातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.
कोरची शहर व तालुक्यात बीएसएनएलची भ्रमणध्वनीसेवा आहे. बीएसएनएल व्यतीरिक्त या तालुक्यात दुसरे नेटवर्क नाही. कोरची शहरासह बेतकाठी व ग्रामीण भागातील बीएसएनएल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएलचे कोरची येथील दोन्ही कार्यालय व तीनही टॉवरचे मिळून एकूण २ लाख ५६ हजार रूपयांचे दोन महिन्यांचे वीज बिल प्रलंबित आहे. वीज बिल भरण्यासंदर्भात महावितरणच्या वतीने अनेकदा सूचित करण्यात आले. मात्र वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी बीएसएनएल सेवा प्रभावित झाली आहे.
कोरची तालुक्यातील बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे बीएसएनएल ग्राहकांना नेहमीच असुविधेचा सामना करावा लागतो. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराप्रती बीएसएनएलच्या ग्राहकांनी रोष व्यक्त केला आहे. कुरखेडा व देवरी मार्गावर मुख्य कार्यालयाजवळ बीएसएनएलचे एक टॉवर आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दुसरे तर बेतकाठी येथे तिसरे टॉवर आहे. दोन टॉवरची सेवा बंद आहे. परिणामी भ्रमणध्वनीधारकांना त्रास होत आहे.

कोटगूल येथे क व्हरेजची समस्या गंभीर
कोटगूल येथील बीएसएनएलचा टॉवर सॅटेलाईटवर चालविण्यात येत आहे. मात्र या टॉवरचे बीटीएस व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. कोटगूल गावाची लोकसंख्या १ हजार पेक्षा कमी आहे. या ठिकाणी मोबाईल वापरणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. तरीही कव्हरेज पुरत नाही. या ठिकाणी पोलीस मदत केंद्र आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान कार्यरत आहेत. मोबाईलचा कव्हरेज राहत नसल्यामुळे आप्तजणांसोबत संपर्क साधणे कठीण होत आहे. इंटरनेटची स्पिड अतिशय कमी आहे. सोबतच फोनही लागत नाही.

महावितरणच्या वीज बिलाचा भरणा लवकरच करण्यात येईल. वीज बिल भरल्यानंतर टॉॅवरवरून बीएसएनएलची सेवा लगेच सुरू करण्यात येईल. आमचा प्रयत्न सुरू आहे.
- प्रफुल कुलसंगे, कनिष्ठ अभियंता, ३३ के व्ही वीज उपकेंद्र, कोरची

Web Title: BSNL's power supply disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.