बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:57 PM2019-04-16T23:57:25+5:302019-04-16T23:58:11+5:30

सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.

The bundle threatens river banks | बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

Next
ठळक मुद्दे४० लाखांचा खर्च पाण्यात : १० वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.
नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी शिवकालीन बंधारे बांधले जात होते. हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही नदी, नाल्यांवर शिवकालीन बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर बंधारे प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आले होते. मात्र ते चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. सदर बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने या बंधाºयामुळे एक दिवस नदीचे संपूर्ण काठच सपाट होण्याची भीती आहे.
कुरखेडा तालुक्यातील कढोली गावातून वाहणाºया सती नदीच्या पात्रात सन २००८-०९ या वर्षांत ४० लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने बंधारा फुटला. शिवकालीन बंधारा हा जमिनीच्या भूगर्भात बांधला जातो, पण हा पंधारा नदी पात्राच्या तीन फूट उंच बांधण्यात आला. शिवकालीन बंधाºयाची सिमेंट भिंत नदीपात्राच्या समांतर असते. मात्र सती नदीवरचा बंधारा तीन फूट उंच बांधण्यात आला. बंधारा तर पहिल्याच वर्षी वाहून गेला. मात्र त्याचे अवशेष अजूनही नदीपात्रात आहेत.
नदीचे पाणी बंधाऱ्याच्या या अवशेषांना आपटते व परत नदीकाठावर येते. त्यामुळे नदीकाठ खचत आहे. मागील १० वर्षांत बंधाºयापासून काही दूर अंतरावरील नदीकाठ खचले आहे. जवळपास आठ ते दहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. या योजनेवर झालेला ४० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
बंधारा नष्ट करा
बंधारा नष्ट झाला असला तरी या बंधाऱ्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या अवशेषांना नदीचे पाणी आदळून ते नदीकाठालाही आदळते. सतत जवळपास चार महिने नदीकाठाला पाणी आदळत असल्याने नदीकाठ खचत चालला आहे. आठ ते दहा एकरातील शेती नष्ट झाली आहे. भविष्यात पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाºयाचे अवशेष नष्ट करावे, अशी मागणी आहे.

Web Title: The bundle threatens river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.