वाघांना पकडून जंगलव्याप्त भागात साेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:33+5:302021-05-25T04:40:33+5:30
वाघाने हल्ला करून ठार केलेल्या दिभना गावातील वंदना जेंगठे या महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यापूर्वी ...
वाघाने हल्ला करून ठार केलेल्या दिभना गावातील वंदना जेंगठे या महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यापूर्वी या परिसरात काही महिन्यांपूर्वी दाेन घटना घडल्या. दिभना, गाेगाव, महादवाडी, चुरचुरा, कुहाडी या परिसरात ३ ते ४ वाघांचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. या गावांमध्ये शेतकऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात असून, गावाच्या सभाेवतालच्या परिसरात शेती आहे. वाघाच्या दहशतीने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या आठवड्यात दिभना गावातील वंदना अरविंद जेंगठे या सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.
त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिभना गावात जाऊन जेंगठे परिवाराला मदत देत त्यांना धीर दिला. य़ावेळी ग्रा. पं. सदस्य धनराज जेंगठे, शिवसेनेचे शाखाप्रमुख दामाेदर गुरनुले, नरेश माेहुर्ले, शिवसैनिक नरेश चुटे, प्रवीण रामगीरवार, तसेच गावातील नागरिक हजर हाेते. वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही पाेरड्डीवार व पदाधिकाऱ्यांनी दिली.